करोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. अनेक चित्रपट आणि मालिकांचे देखील चित्रीकरण थांबवण्यात आले. त्यामुळे अनेक कलाकार आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. तसेच ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. अशातच एका बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील अभिनेत्रीने सोशल मीडियावरील पिलो चॅलेंज पूर्ण करत शेअर केलेल्या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील सई लोकूर आहे. सईने सोशल मीडियावर सुरु असलेले पिलो चॅलेंज अनोख्या पद्धतीने पूर्ण केले आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तिने चक्क पिलोचा ड्रेस तयार केला आहे.

सईने तिच्या हा पिलो चॅलेंजचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने उशीचा ड्रेस म्हणून वापर केला आहे. तिने ही उशी निळ्या रंगाच्या रिबीनने बांधली आहे. तसेच त्याच्यावर मॅचिंग असा निळा रंगाचा हेअर बॅण्ड, गळ्यात निळ्या रंगाचा नेकलेस परिधान केला आहे. या लूकमध्ये सई अत्यंत क्यूट आणि सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहते त्यावर कमेंट आणि लाईकचा वर्षाव करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सई बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील अतिशय लोकप्रिय स्पर्धक होती. मेघा धाडे, पुष्कर जोग आणि सई लोकूर या त्रिकूटाची त्यावेळी विशेष चर्चा असायची. सईने मिशन चॅम्पियन या चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिची आई वीणा लोकूर यांनी केले होते. त्यानंतर सईने किस किसको प्यार करु या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.