करोना विषाणूशी लढा देण्यासाठी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत मदतीचा ओघ येऊ लागला आहे. अनेक बॉलिवूड व दाक्षिणात्य कलाकारांनी आर्थिक मदत केली. त्यात आता मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची भर पडली आहे. सईने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १.५ लाख रुपये जमा केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना विषाणूने संपूर्ण जगासमोर आव्हान निर्माण केले आहे. देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला असला तरी करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २४ झाली असून, आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९६ जणांची प्रकृती बरी झाल्यानं घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

कलाकारांकडून शक्य तेवढी आर्थिक मदत केली जात आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. तर बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारने तब्बल २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटींकडूनही सढळ हाताने मदत केली जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar donated inr 1 5 lakh to cm relief fund for fighting against coronavirus ssv
First published on: 30-03-2020 at 11:39 IST