वर्षाला किमान एक सुपरहिट चित्रपट देणारी सई ताम्हणकर २०१७ मध्ये चित्रपटांपासून थोडी दुरावलेले दिसली. ‘फॅमिली कट्टा’ आणि ‘वजनदार’ या चित्रपटांतून सईने लक्षात राहतील अशा भूमिका केल्या होत्या. त्यानंतर मात्र तिच्या प्रेक्षकांना पडद्यावर तिची कमी जाणवत होती. दरम्यानच्या काळात ती अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभागी झाली. परंतु सईचा आगामी चित्रपट कोणता असेल याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. २०१८ मध्ये नवीन चित्रपट घेऊन येण्यासाठी आता सई सज्ज झाली आहे. नवीन वर्षाची भेट म्हणून ती लवकरच तिच्या चाहत्यांसाठी ‘राक्षस’ नावाचा चित्रपट घेऊन येतेय. ‘राक्षस’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : ‘प्रभो शिवाजी राजा’ मधून दिसणार महाराजांचे शिवचरित्र

आतापर्यंत सईने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. त्यात सई-स्वप्नील ही जोडी प्रेक्षकांना फार आवडली, परंतु पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि शरद केळकर या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसतील. ‘लई भारी’ नंतर शरद केळकरचा हा दुसरा मराठी चित्रपट असेल ज्यात तो सईसोबत दिसणार आहे.

वाचा : भाडे न दिल्याने बॉयफ्रेंडसह मल्लिकाला घरमालकाने काढले बाहेर

ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ चित्रपटाची कथा कौटुंबिक पार्श्वभूमीवर बेतलेली असून यात थ्रिलर सस्पेन्सदेखील पाहायला मिळणार आहे. ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा यांच्यासोबत दिग्दर्शक समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स’ ‘राक्षस’ चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar sharad kelkar raakshas teaser poster
First published on: 15-12-2017 at 10:26 IST