अभिनेता सैफ अली खान लवकरच एका वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सेक्रेड गेम्स’ असं या वेब सीरिजचं नाव असून यामधील त्याचा लूक आता सर्वांसमोर आला आहे.
मुंबईतील वांद्रे इथल्या एका गुरुद्वाराजवळ वेब सीरिजचं चित्रीकरण सुरु होतं. यामध्ये सैफ पुन्हा एकदा पंजाबी लूकमध्ये दिसणार आहे. यापूर्वी ‘लव्ह आज कल’मध्येही तो अशाच लूकमध्ये दिसला होता. या फोटोंमध्ये तो पगडी बांधलेला पोलिसाच्या वेशात पाहायला मिळतोय. सीरिजमध्ये सैफ सरताज नावाच्या एका सिख पोलिसाची भूमिका साकारत आहे.
https://www.instagram.com/p/BYtpN25BEV4/
वाचा : माहिरासाठी पुढे सरसावली दीपिका
विक्रम चंद्रा यांच्या पुस्तकावर ही वेब सीरिज आधारित असून अनुराग कश्यप याचं दिग्दर्शन करत आहेत. नवाझुद्दीन सिद्दीकीसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. सैफचा ‘शेफ’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला, पण बॉक्स ऑफीसवर तो अपयशी ठरला. आता पहिल्यांदाच तो वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याने याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलंय.