अवघ्या देशभराला याड लावलेला ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षक कधीच विसरु शकणार नाहीत. या चित्रपटातून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या दोन नव्या चेहऱ्यांना कलाविश्वाशी ओळख करुन दिली. विशेष म्हणजेच पहिल्याच चित्रपटातून या दोन नवोदित कलाकारांनी त्यांच्यातील अभिनयाची झलक दाखविली. या चित्रपटानंतर दोन्ही कलाकारांचं नशीब चांगलंच पालटलं आहे. काही दिवसापूर्वीच अभिनेता आकाश ठोसरचा मेकओव्हर करण्यात आला होता. ‘सैराट’नंतर आकाश ‘लस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच त्याचा बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत झळकण्याची संधी मिळाली.
‘सैराट’, ‘लस्ट स्टोरी’, ‘एफयू’ या चित्रपटामध्ये झळकलेला आकाश आता छोट्या पडद्यावर झळकला आहे. त्याला सेट-वेटची जाहिराती मिळाली असून या जाहिरातीमध्ये तो अभिनेता रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. आकाशने या जाहिरातीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या जाहिरातीमध्ये रणवीर त्याच्या बिंधास्त अंदाजामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
View this post on Instagram
Sada Sexy Raho Man@ranveersingh @rajeshsaathi @setwetstyling @keroscenefilms @aalimhakim #setwet
आकाशने जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करुन त्याला ‘Sada Sexy Raho Man…’ असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच रणवीर सिंहला टॅगही केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आकाशच्या लूकची चर्चा आहे. सैराटमध्ये त्याने साकारलेल्या गावरान मुलाच्या भूमिकेनंतर त्याच्यामध्ये कमालीचा बदल झाला आहे. इतकंच नाही तर आता त्याची वाटचाल हळूहळू हिंदी चित्रपटसृष्टीच्या दिशेने होऊ लागली आहे.
