Video : लग्नापासून घराणेशाहीपर्यंत सखी-सुव्रतशी मनमोकळ्या गप्पा

पाहा संपूर्ण मुलाखत

suvrat-sakhi
सखी गोखले-सुव्रत जोशी

मराठीतील लोकप्रिय जोडी सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर मनमोकळ्या गप्पा मारल्या. हे दोघं सध्या लंडनमध्ये आहेत. तिथे नेमकं काय करत आहेत, ते पुन्हा भारतात कधी येणार आहेत, त्यांचे पुढील प्रोजेक्ट्स काय असतील या सर्व विषयांवर ते व्यक्त झाले. याचसोबत त्यांच्या लग्नाची गोष्ट, मराठी इंडस्ट्रीतील घराणेशाही या मुद्द्यांवरही त्यांनी मत मांडलं.

पाहा त्यांची ही खास मुलाखत-

सखी ही प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखले आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची कन्या आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे सखी आणि सुव्रतची जोडी घराघरात पोहोचली. त्यानंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात आणि ‘दिल दोस्ती दोबारा’ या मालिकेतही दोघांनी एकत्र काम केलं. मालिकेच्या सेटवरच दोघांच्या प्रेमाचा अंकुर फुलल्याचं म्हटलं जातं. सुव्रतने ‘शिकारी’, ‘पार्टी’, ‘डोक्याला शॉट’, ‘मन फकिरा’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sakhi gokhale and suvrat joshi special interview on loksatta digital adda ssv