अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी यांची पहिली भेट कशी झाली, पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं आणि आता हे दोघं लंडनमध्ये काय करत आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत दिली. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेच्या सेटवर झालेलं कडाक्याचं भांडण आणि त्यानंतर झालेली घट्ट मैत्री व मैत्रीपासून लग्नापर्यंतचा प्रवास याबद्दल दोघांनीही मोकळेपणाने सांगितलं.

पाहा त्यांचा हा व्हिडीओ-

सखी ही प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखले आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची कन्या आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे सखी आणि सुव्रतची जोडी घराघरात पोहोचली. त्यानंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात आणि ‘दिल दोस्ती दोबारा’ या मालिकेतही दोघांनी एकत्र काम केलं. मालिकेच्या सेटवरच दोघांच्या प्रेमाचा अंकुर फुलल्याचं म्हटलं जातं. सुव्रतने ‘शिकारी’, ‘पार्टी’, ‘डोक्याला शॉट’, ‘मन फकिरा’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.