कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असो, एखादा कार्यक्रम असो, चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्याबद्दलची पार्टी, बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानचं संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन प्रत्येक क्षण आनंदात साजरा करतात. सलमानची आई सलमा खान यांचा शुक्रवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. बहिण अर्पिताच्या घरी हे सेलिब्रेशन होतं आणि पुन्हा एकदा खान कुटुंबिय एकत्र जमले होते. शुटिंग आणि प्रमोशनच्या व्यग्र वेळापत्रकातून सलमानने आईसोबत काही क्षण व्यतित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलमान, अरबाज, सोहेल, सलीम खान, हेलन, सोहेलची पत्नी सीमा खान आणि मलायका अरोरा यावेळी उपस्थित होते. यांसोबतच काही जवळची मित्र-मंडळी पार्टीला हजर होती. गेल्या महिन्यात सलमानचे आई-वडील म्हणजेच सलीम आणि सलमा यांच्या लग्नाचा ५३वा वाढदिवस खान कुटुंबियांनी एकत्र येत साजरा केला होता.

सलमानचा जिवलग मित्र आणि दिग्दर्शक निर्माता साजिद नाडियादवाला पत्नीसह सलमा यांच्या वाढदिवसाला आवर्जून हजर राहिला. त्यासोबतच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनेही या सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतला. तर सलमानची कथित प्रेयसी लुलिया वंतूरसुद्धा यावेळी तिथे उपस्थित होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan and family celebrate salma khan birthday
First published on: 09-12-2017 at 12:47 IST