बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडत होती. आता त्या दोघांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘हम दिल दे चुके’ या हिट चित्रपटातील ‘चांद छुपा बादल में’ गाण्यावर डान्स केला आहे.
सलमान आणि शिल्पाचा ‘चांद छुपा बादल में’ गाण्यावरील रोमँटीक अंदाज पाहण्यासारखा आहे. सध्या सोशल मीडियावर जुन्या व्हिडीओंचा ट्रेंड आहे. त्यामुळे सेलिब्रिटींचे अनेक जुने व्हायरल होताना दिसत आहे.
सलमना आणि शिल्पाचा हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. एका फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
‘शादी करके फस गया’, ‘फिर मिलेंगे’, ‘अवजार’, ‘गर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये सलमान आणि शिल्पाने एकत्र काम केले होते. त्यावेळी त्यांची जोडी हिट ठरली होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.