‘बेबी को बास पसंद है’ या ‘सुलतान’मधील आगामी चित्रपटातील गाण्यावर प्रेक्षकांना ठेका धरायला लावल्यानंतर सलमानचे याच चित्रपटातील आणखी एक पेपी साँग प्रदर्शित झाले आहे. ‘लगे ४४० वॉल्ट छुने से तेरे’ असे या नव्या गाण्याचे बोल असून, सलमान आणि अनुष्काचा यात रोमॅण्टीकसोबतच नटखट अंदाज पाहायला मिळतो. सलमान आपल्या हटके स्टेप्स या गाण्यात करताना दिसतो. ब्लॅक जॅकेट आणि धोती, असा सलमानचा या गाण्यात अजब लूक लक्षवेधून घेतो. अर्थात बॉलीवूड गाणे असल्याने गाण्यात सलमान-अनुष्का ही जोडी विविध वेशभुषेत पाहायला मिळते. गाणे मिका सिंगने गायले असून, संगीत दिग्दर्शक विशाल-शेखर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. सलमानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर गाण्याची लिंक ट्विट केली आहे.