बॉलिवूडचा भाईजान सलमान खान दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित करत असतो. यंदा देखील सलमानचा ‘राधे’ हा बहुचर्चित चित्रपट ईदला प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असल्याचे म्हटले जात होते. पण सलमानने चाहत्यांना खूश करण्यासाठी चित्रपटाऐवजी म्युझिक अल्बम प्रदर्शित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलमानच्या या अल्बमचे नाव ‘भाई भाई’ असे आहे. या गाण्यातून सलमानने एकात्मतेचा संदेश दिला आहे. त्याने हिंदू मुस्लीम हे भाऊ भाऊ असल्याचे गाण्यात म्हटले आहे. हे गाणे सलमान आणि दानिश सब्री यांनी लिहिले असून गाण्यातील रॅप रुहान अर्शदने लिहिला आहे. तसेच हे गाणे साजिद-वाजिद या जोडीने संगीतबंध केले आहे.

सलमानचे हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. सलमानने लॉकडाउनमध्ये प्रदर्शित केलेले हे तिसरे गाणे आहे. या आधी प्यार करोना आणि तेरा बिना हे म्युझिक अल्बम त्याने लाँच केले होते.

सलमान सध्या लॉकडाउनमुळे त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर आहे. तेथे तो अभिनेत्री जॅकलिन आणि वलूशा डिसूज़ा यांच्यासोबत वेळ घालवताना दिसत आहे. तसेच त्याने याच फार्महाऊसवर त्याचे म्युझिक अल्बम शूट केले आहेत. त्याच्या आधी प्रदर्शित झालेल्या ‘तेरे बिना’ या गाण्यामध्ये त्याच्यासोबत जॅकलिन देखील होती. ‘क्यु माने ना क्यु जाने ना, तेरे बिना कही मेरा जिया लागे ना’ असे या गाण्याचे बोल आहेत. सुधीर एहमद याने या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan bats for hindi muslim brotherhood in special eid song avb
First published on: 26-05-2020 at 11:01 IST