प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘बिग बॉस’चा १५वा सिझन येत आहे. मध्य प्रदेशातील पेंच नॅशनल पार्कमध्ये या शोचा लॉन्च सोहळा नुकताच पार पडला आहे. आता २ ऑक्टोबर पासून बिग बॉस १५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यावेळी स्पर्धकांना घरात प्रवेश करण्यापूर्वी जंगल पार करावं लागणार आहे. ही जंगल थीम काय आहे ते चला पाहूया…
‘बिग बॉस ओटीटी’ ची उपविजेती शमिता शेट्टी आणि निशांत भट ‘बिग बॉस 15’मध्ये सामील होणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलंय. तसचं ‘बिग बॉस ओटीटी’ च्या शर्यतीतून बाहेर पडलेला स्पर्धक प्रतीक सहजपाल ‘बिग बॉस १५’ चं टिकीट मिळवणारा पहिला स्पर्धक ठरला होता. यासोबतच ‘बिग बॉस 13’ चा उपविजेता असीम रियाजचा भाऊ उमर रियाज आणि डोनाल बिश्तदेखील ‘बिग बॉस 15’ च्या घरात सहभागी होणार आहेत. तसचं टेलिव्हिजनवरील हॅण्डसम हंक करण कुंद्रा ‘बिग बॉस १५’मध्ये सामील होणाऱ असल्याचं वृत्त आहे.