कतरिनाने दिले नाही सलमानच्या कुटुंबीयांना लग्नाचे आमंत्रण? अर्पिताने केला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना कतरिनाने लग्नाचे आमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. असे म्हटले जात आहे की डिसेंबर महिन्यात राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाहीथाटात विकी आणि कतरिना लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. पण बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना कतरिनाने लग्न सोहळ्याचे आमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चर्चांवर सलमानची बहिण अर्पिता खानने वक्तव्य करत पूर्णविराम दिला आहे.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार अर्पिताने कतरिनाने लग्नाचे आमंत्रण दिले नाही अशा अफवा असल्याचे सांगितले आहे. कतरिनाने जयपूरमधील लग्न सोहळ्याला सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना आमंत्रण दिल्याचे तिने स्पष्ट केले. तसेच अर्पिता आणि अल्विरा कतरिनाच्या लग्नाला हजेरी लावणार असल्याचे समोर आले आहे.
आणखी वाचा : कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नावर सलीम खान यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

तर दुसरीकडे खान कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी माहिती याबाबत माहिती दिली. ‘कतरिनाने खान कुटुंबीयांना लग्नाचे आमंत्रण दिलेले नाही. तसेच अर्पिता आणि अल्विरा यांना देखील लग्नाचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. सलमान खानच्या कुटुंबीयांना आमंत्रण मिळाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत’ असे सूत्रांनी म्हटले आहे.

कतरिना आणि विकी ७ ते १२ डिसेंबर दरम्यान लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाच्या वेळी फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही शाही लग्नासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. लग्नाच्या सर्व तयारीसाठी त्यांची टीम याची चाचपणी सध्या करत आहे, असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan family not invited to vicky katrina wedding arpita reveals truth avb

Next Story
“मी मेल्यानंतर…”; कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी