सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ १३ मे ला ईदच्या निमित्ताने रिलीज झालाय. हा सिनेमा देशभरातील विविध चित्रपटगृह आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलाय. दुबईमध्ये तर सलमानाच्या राधेला चांगला प्रतिसाद मिळतोय. राधे पाहण्यासाठी इथल्या सिनेगृहात अनेकांनी गर्दी केली. यानंतर कमाल आर खान म्हणजेच केआरकेला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय.

केआरके ने ‘राधे’ सिनेमा पाहिल्यानंतर एक ट्विट केलं होतं.यात तो म्हणाला होता की ‘राधे’ सिनेमा पाहिल्यानंतर त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला औषधं घेवून काही तास आराम करावा लागला होता. मात्र आता ‘राधे’ सिनेमा पाहिल्यानंतर चाहत्यांनी केआरकेला ट्रोल केलंय.
केआरकेने एक ट्विट केलं. यात तो म्हणाला, “मी दुबईमधील वॉक्स सिनेमात ‘राधे’ सिनेमा पाहिला. मात्र आता मी सिनेमाचा रिव्हू करण्याच्या स्थितीत नाही. कृपा करून मला औषधं घेऊ द्या आणि 2-3 तास आराम करू द्या. माझी मनस्थिती ठिक होईल आणि मी रिव्हू करू शकेल अशी आशा करतो.” या ट्विटनंतर सलमानच्या चाहत्यांनी लगेचच केआरकेच्या चाहत्यांनी निशाणा साधला.

केआरकेच्या ट्विटवर एक युजर म्हणाला, “राधे या दशकातली माईंड ब्लोइंग मूवी आहे. कच रा खान एक काम करा जाऊन आराम करा. रेस्ट इन पीस!” तर ‘राधे’ सिनेमातील गाण्याचा दाखला देत एक युजर म्हणाला, “सीटी मारत रहा तब्येत ठीक होईल. ईमानदारीचा हा एक सल्ला आहे. ”

वाचा: गंगा नदीतील मृतदेह पाहून परिणीती आणि फरहान संतापले; म्हणाले “राक्षस”

आणखी एक युजर म्हणाला, ” कमाल आहे भाई, ट्रेलरला नावं ठेवलं होतं. म्हणाला कचरा आहे. मग कचऱ्यात तोंड घालायला कशाला गेलास. वाईट प्रचार केल्याचेच पैसे मिळतात ना.” असं म्हणत नेटकऱ्यांने केआरकेचा समाचार घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केआरके सिनेमाचे रिव्हू सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसचं देशातील विविध घडामोडींवर त्याचं मत मांडत असतो. त्याच्या वक्तव्यांमुळे केआरके अनेकदा ट्रोलही झालाय.