‘फोर्ब्ज’ने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या जगातील १०० कलाकारांची यादी जाहीर केली आहे. ‘फोर्ब्ज’च्या १०० सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या या यादीत बॉलिवूडचा ‘सुलतान’ सलमान खानचाही समावेश आहे. सलमान खानला यादीत ७१ वं स्थान दिलं गेलंय. १ जून २०१६ ते १ जून २०१७ दरम्यान सलमानने जवळपास ३.७ कोटी डॉलरची कमाई केलीये. या यादीत समाविष्ट झाल्यानंतर सलमानची प्रतिक्रिया विचारली असता तो स्वत: हा सगळा पैसा गेला कुठे, या विचारात पडलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका मुलाखतीदरम्यान सलमानने सांगितले की ‘फोर्ब्ज’ची यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो यासंदर्भात शाहरूख खानसोबत चर्चा करत होता. या चर्चेदरम्यान सलमान शाहरूखला म्हणाला की, ‘हे काय (फोर्ब्ज यादी) आहे? नेहमी आपल्याला ही किंवा ती वस्तू खरेदी करताना पैसे कमी पडतात. आतापर्यंत मी स्वत:चं एक घरदेखील खरेदी करू शकलो नाही. पूर्वी घर घेण्यासाठी मला काही लक्ष रूपये कमी पडत होते आणि आता काही कोटी रुपये कमी पडत आहेत आणि आता ही फोर्ब्जची यादी. माझ्याकडे खरंच एवढा पैसा नाही. मी याच विवंचनेत आहे. हा पैसा आहे कुठे भाऊ? कुठे आहे?’

वाचा : झहीरसोबत वेस्ट इंडीजमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटतेय सागरिका

पुढे चित्रपटांतील कमाईचे गणित समजावताना सलमान म्हणाला की, ‘जेव्हा एखादा चित्रपट ५०० कोटींची कमाई करतो, तेव्हा त्यापैकी खूप छोटी रक्कम आम्हाला मिळते. याचा फक्त इतकाच अर्थ होतो की तुमच्या चित्रपटाने ५०० कोटींचा व्यवसाय केला.’ या उत्तरानंतर सलमानला एक साहजिक प्रश्न पत्रकाराने विचारला की त्याला त्याच्या व्यवसायातून पुरेसा पैसा मिळतो का? यावर सलमानने उत्तर दिले की, ‘उत्तम व्यावसायिकाचे गुण माझ्यात नाहीत. मी जे काही कमावतो, त्यापैकी काही रक्कम सहकाऱ्यांना मिळते तर उरलेल्या रकमेत कर भरावा लागतो. बिईंग-ह्युमन क्लोथिंगसाठी आमच्याकडे एक पार्टनर आहे जो एक निश्चित रक्कम घेतो. आमच्याकडे आलेल्या पैशांमधून आम्ही कर भरतो आणि उरलेला पैसा बिईंग-ह्युमनसाठी वळवला जातो. दागिने आणि सायकलच्याबाबतही हाच नियम लागू होतो. समाजसेवी संस्थांसाठी आम्ही काय करू शकतो हाच आमचा व्यावसायिक उद्देश आहे. आतासुद्धा त्यासाठी आम्ही खूप काही करत आहोत.’ ‘फोर्ब्ज’च्या यादीत शाहरूख खानला ६५ वे स्थान तर अक्षय कुमारला ८० वे स्थान देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan is wondering where is all that money goes after listed in 100 highest paid actors in forbes
First published on: 26-06-2017 at 21:05 IST