झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची हवा अगदी बॉलीवूडपर्यंत गेली आहे. त्यामुळे बॉलीवूड कलाकार आता त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात येऊ लागले आहेत. आजवर या कार्यक्रमात शाहरूख खान, रितेश देशमुख, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन सारख्या अनेक लोकप्रिय हिंदी स्टार्सने हजेरी लावत या कार्यक्रमाला चार चांद लावले आणि या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. बॉलीवूडचा दबंग खान सलमान याने या कार्यक्रमात उपस्थिती लावली आहे. नुकतेच या भागाचे चित्रीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ते सलमानचं मराठमोळं रूप. या पूर्ण कार्यक्रमात सलमानने जास्तीत जास्त मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला आहे. सलमानला सर्व मराठी नीट कळतं आणि आपल्या घरातही आई आणि तिचे नातेवाईक कसे मराठी बोलतात याबद्दलचे धम्माल किस्सेही सलमानने यावेळी सांगितले. यावेळी कलाकारांच्या विनंतीवरून सलमानने झिंगाट आणि शांताबाई या गाण्यावर अगदी मराठमोळा ठेकाही धरला. बॉलिवुडसाठी दबंग असणा-या या सुपरस्टारचं हे मराठमोळं रूप बघायला प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. येत्या सोमवार आणि मंगळवारी चला हवा येऊ द्याचे हे दोन्ही भाग रात्री ९.३० वा. झी मराठीवरून प्रसारित होतील.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2016 रोजी प्रकाशित
मराठमोळा सलमान
सलमानने झिंगाट आणि शांताबाई या गाण्यावर अगदी मराठमोळा ठेकाही धरला.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 01-07-2016 at 13:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan promoting his upcoming movie sultan on set of chala hawa yeu dya