जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बॅटरीवर चालणाऱ्या सायकलचं सलमान खानने काही दिवसांपूर्वीच अनावरण केलं. त्यावेळीसुद्धा सलमान आपल्या निवासस्थानापासून मेहबूब स्टुडिओपर्यंत सायकलवरून गेलेला. आणि आता पुन्हा एकदा मुंबईकरांनी दबंग खानला रस्त्यावर मुक्तपणे सायकल चालवताना पाहिलं. वांद्रे येथील परिसरात सायकल चालवतानाचा एक व्हिडिओ सलमानने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. मात्र सलमानचा हा व्हिडिओ सलमान आणि शाहरूखच्या चाहत्यांसाठी नक्कीच विशेष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडिओमध्ये सलमानच्या आजूबाजूला त्याचे बॉडीगार्डदेखील सायकल आणि बाईकवर दिसत आहेत. सलमान सायकल चालवत शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यासमोरून जाताना दिसतोय. बंगल्यासमोरून जाताना सलमान शाहरूखनच्या नावाने ओरडला आणि त्याक्षणी चाहतेसुद्धा त्याला प्रोत्साहित करत होते. दरम्यान चाहत्यांसाठी आपल्या आवडत्या अभिनेत्याला रस्त्यावर सायकल चालवताना पाहण्याची ही पर्वणीच ठरली. शाहरूखच्या बंगल्यासमोरून त्याचं मोठ्याने नाव घेताना आणि त्यानंतर सलमानच्या चेहऱ्यावरील हास्य दर्शवणारा हा पाहा व्हिडिओ…

सलमानला सायकल चालवताना पाहून लोकांच्याही आनंदाचा पारावर उरला नाही. काही जण ‘भाईजान-भाईजान’ नावाने त्याला हाक मारत होते. तर काही जण आपल्या लाडक्या अभिनेत्याला हात मिळवण्यासाठी पुढे आले. त्यामुळे आपल्या या अनोख्या आणि गमतीशीर अंदाजाने सलमान नेहमीच चाहत्यांना खूष करून जातो असंच म्हणावं लागेल.

PHOTO : भाचा तैमुरसोबत रणबीरचा फोटो व्हायरल

‘बिईंग ह्युमन’च्या ई-सायकलच्या अनावरण कार्यक्रमादरम्यान सलमान म्हणाला की, ‘मी लहान होतो तेव्हा नेहमी सायकल चालवायचो. आजकाल लोक हायपॉवर बाईक चालवणे पसंत करतात, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. तरुणांसाठी आणि इतरांसाठीही सायकल चालवणे योग्य आहे. मात्र मोटारसायकल धोकादायक आहे.’‘मैने प्यार किया’ चित्रपट असो किंवा ‘किक’ आणि आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटातही सुरूवातीपासूनच ऑनस्क्रीन सायकल चालवण्याबाबत उत्सुकता असल्याचे सलमानने यावेळी सांगितले. सलमान खानचा नवा चित्रपट ‘ट्युबलाइट’ २३ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan rides a cycle on mumbai streets and shouts shah rukh khan name while passing his bunglow mannat
First published on: 17-06-2017 at 15:09 IST