सलमान खान आणि कतरिना कैफच्या केमिस्ट्रीबद्दल तर सगळ्यांनाच माहित आहे. प्रेम प्रकरण आणि त्यानंतरचं ब्रेकअप या सगळ्याच कारणांनी या दोघांचं नाव नेहमीच चर्चेत राहिल आहे. त्यात आता कतरिनाचं रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यामुळे ती पुन्हा एकदा सलमान खानच्या गँगमध्ये दिसू लागली आहे. त्यांच्यामधील ही वाढती जवळीक पाहून अनेकांनाच आता त्यांच्या नात्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
शाहरूखच्या जेवणासाठी चक्क १० हजारांची सोन्याची थाळी
नुकताच अमेरिकेत आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये सलमानच्या परफॉर्मन्सकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तो स्टेजवर आला त्याने पाहिलं आणि त्याने प्रेक्षकांची मनं जिंकलीही. नेहमीप्रमाणे त्याचा परफॉर्मन्स तर हीट झालाच पण या परफॉर्मन्समधील एक गाणे हे कतरिनासाठी होते. आज कतरिनाचा वाढदिवस असल्यामुळेच त्याने त्याच्या परफॉर्मन्समधील एक गाणे खास कतरिनासाठी निवडले होते. डान्स करताना सलमान काही क्षण थांबला आणि कतरिनाकडे बोट दाखवून तो म्हणाला की, ‘झोया टायगर अभी जिंदा है’ सलमानचं हे विधान ऐकून अनेकांचीच हृदय घायाळ झाली असेल यात काही शंका नाही.
कतरिनाला चांगलं वाटावं म्हणून सलमानने घेतलेली ही मेहनत नक्कीच वाखाण्याजोगी आहे. पत्रकार परिषदेवेळीही सलमानने जेव्हा कतरिनाला पाहिले तेव्हा तो उठून तिच्याकडे गेला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जर तुमच्या लक्षात आलं असेल तर गेल्या वर्षभरात सलमान कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गेला तरी तो तिथे कतरिनाचेच गोडवे गाताना दिसतो. उत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीमध्ये सलमानसाठी कतरिना नेहमीच पहिल्या स्थानावर असते.
★TIGER Abhi Zinda Hai… Glimpse Into The SCINTILLATING Performance of The Year, #SalmanKhan Burning up The stage at #IIFAAwards 2017!! #iifa pic.twitter.com/Bgq91CpQQX
— SᴀʟᴍᴀɴKʜᴀɴLɪᴄɪᴏᴜs ?Sɪᴋᴀɴᴅᴇʀ Rᴀᴄɪɴɢ Iɴᴛᴏ Uʀ Hᴇᴀʀᴛ… (@SalluLicious) July 16, 2017
सलमानसमोरच कतरिना जेव्हा ऐश्वर्याच्या गाण्यांवर थिरकते
सध्या कतरिनाचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटत असताना तिला सलमानकडूनच मनोबळ मिळत आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. लवकरच ही जोडी टायगर जिंदा है या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास झफर दिग्दर्शित हा सिनेमा या वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार आहे.