बॉलीवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ होण्यास सज्ज झाला आहे. बिग बॉसचा नववा सिझन लवकरच सुरु होणार असून, त्याचे सूत्रसंचालन सलमान करणार असणार असल्याचे कळते. गेल्या पाच सिझनचे त्याने सूत्रसंचालन केले होते. मात्र, आठवा सिझन अती लांबवल्यामुळे त्याने बिग बॉसचा तो सिझन सोडून दिला होता. त्यानंतर फराह खानने सूत्रसंचालनाची सूत्रे हाती घेतली होती. नव्या सिझनचे सलमान सूत्रसंचालन करणार असल्याची चर्चा असली तरी कलर्स वाहिनीने याविषयी कोणतीही पुष्टी केलेली नाही. बिग बॉसच्या आठव्या सिझनच्या सूत्रसंचालनाची सूत्र हाती घेऊन आपण खूप नाखूष आहोत. कारण, या सिझनने मला खूप त्रास दिला आणि थकवलयं, अशी प्रतिक्रिया यापूर्वी सलमानने दिली होती. त्यामुळे एकंदरीत तो पुन्हा बिग बॉसच्या मंचावर दिसेल की नाही ही शंकाच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan to return as the host of bigg boss season
First published on: 21-08-2015 at 12:55 IST