अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या ‘धाडक’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख अखेर जाहीर केलीय. कंगनाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमातील तिचे वेगवेगळे लूक शेअर केले आहेत. या सिनेमात कंगना ‘एजंट अग्नी’ या गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. ८ एप्रिल २०२२ ला हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं कंगनाने तिच्या पोस्टमध्ये जाहीर केलंय.

कंगनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे वेगवेगळे हटके लूक पाहायला मिळत आहेत. कंगनाच्या या लूकला दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने कमेंट करत पसंती दिली आहे. कंगनाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हंटलंय, “ती तापट, धाडसी आणि निर्भय आहे. एजंट अग्नी मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. तुमच्यासाठी एप्रिल २०२२ रोजी घेऊन येत आहोत अॅक्शन थ्रीलर ‘धाकड’ असं कंगनाने म्हंटलंय.

तरुणाने अमिताभ बच्चन यांना दाखवून दिली चूक, बिग बींनी माफितली माफी

कंगनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे चार लूक पाहायला मिळत आहे. एका फोटोत कंगनाचा शॉर्ट हेअर कट दिसतोय. तर एकात तिचे लाल रंगाचे केस दिसून येत आहेत. कंगनाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तर अभिनेत्री समांथाने या फोटोला लाईक देत कमेंट बॉक्समध्ये फायरचे इमोजी दिले आहेत.

काही दिवसांपूर्वीच कंगनाने समांथाचा ‘महिला सक्षमीकरणाचे प्रतीक’ म्हणून उल्लेख करत तिचं कौतुक केलं होतं. तर नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर देखील कंगनाने तिचं मत मांडलं होतं. कोणत्याही घटस्फोटासाठी पुरुषच जबाबदार असल्याचं कंगना म्हणाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘धाकड’ सिनेमात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता देखील महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. या सिनेमात लहान मुलांची तस्करी आणि स्त्रियांच्या शोषणाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.