स्टार प्रवाहवर ७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या मालिकेमधून शिवानी रांगोळे एका हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेही असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून या लूकसाठी शिवानीने केलेला मेकओव्हर सध्या चर्चेत आहे.

शॉर्ट हेअर आणि शिवानीचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधून घेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत शिवानीने साकारलेल्या रमाबाई आंबेडकरांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. शिवानी रमाबाईंची भूमिका खऱ्या अर्थाने जगली. त्यामुळे नव्या भूमिकेसाठी सज्ज होताना तीने मेकओव्हर करण्याचं ठरवलं.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ असणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेविषयी सांगताना शिवानी म्हणाली, “रमाबाईंची भूमिका खूपच वेगळी होती. मालिकेची सांगता झाल्यानंतर सांग तू आहेस का मधील वैदेहीच्या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारणा झाली तेव्हा मी लूक बदलला. लूक बदलल्यानंतर ती व्यक्तिरेखा सापडायला मदत होते असं मला वाटतं. वैदेही ही व्यक्तिरेखासुद्धा खूपच वेगळी आहे. प्रोमोमध्ये दिसणारा थ्रीलरचा फील प्रत्येक एपिसोडमध्ये जपला जाणार आहे. विशेष म्हणजे ही एक रोमॅण्टिक स्टोरी सुद्धा आहे. त्यामुळे मला काम करताना खूप छान वाटतं आहे.”

ही नवी मालिका ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.