नुकताच अभिनेता जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ या चित्रपटातील ‘ओ साकी साकी’ या गाण्याचे रिक्रिएट व्हर्जन प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री नोरा फतेही बेली डान्स करताना दिसत आहे. हे गाणे नेहा कक्कर आणि तुलसी कुमार यांनी गायले असून तनिष्क बागचीने रिक्रिएट केले आहे. परंतु ‘ओ साकी साकी’ या मूळ गाण्यात अभिनेत्री कोयना मित्रा आणि संजय दत्त आहेत.

‘ओ साकी साकी’ हे गाणे ‘मुसाफिर’ या चित्रपटीत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री कोयना मित्रा आणि अभिनेता संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. काही दिवसांपूर्वीच या नव्या गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनमुळे कोयना मित्राने नाराजी व्यक्त केली होती. आता संजय दत्तनेदेखील या गाण्याबद्दलचे आपले मत मांडले आहे.

bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
Ulta-Chashma
उलटा चष्मा: नवी ‘भूमिका’
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?

‘ओ साकी साकी’ गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनमुळे हे गाणे किती लोकप्रिय आहे हे कळते आणि ही आनंदाचीबाब आहे असे संजय दत्त म्हणाला. संजय दत्तच्या या प्रतिक्रियेवरुने तो रिक्रिएट व्हर्जनमुळे आनंदी असल्याचे दिसत आहे.

यापूर्वी ‘मुसाफिर चित्रपटातील माझे गाणे ओ साकी साकी रिक्रिएट करण्यात आले आहे. सुनिधी चौहान, सुखविंदग सिंह, विशाल आणि शेखर यांची जुगलबंदी अफलातून होती. हे रिक्रिएट व्हर्जन मला आवडले नाही’ असे लिहिती कोयना मित्राने नाराजी व्यक्त केली होती.

नुकताच संजय दत्तने ‘बाबा’ या चित्रपटातून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धूरा राज आर गुप्ता यांच्या खांद्यावर होती. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.