दाक्षिणात्य सुपरस्टार विजयचा ‘मास्टर’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाची कथा कॉलेजमध्ये मानसशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकाच्या अवतीभोवती फिरणारी होती. मास्टर चित्रपटातील गाणी देखील खूप लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाला अनिरुद्ध रविचंद्रन याने संगीत दिलं होतं. लोकेश कन्नगराज हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. मध्यंतरी विजयचा ‘बिस्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या आगामी चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

लोकेश कन्नागराज विजयच्या आगामी चित्रपटाचे, ‘थलापथी ६७’ (Thalapathy 67) या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. लोकेशचा ‘विक्रम’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. विक्रम या चित्रपटामध्ये कमल हासन, फहाद फाझिल आणि विजय सेतुपती अशा सुपरस्टार्संनी एकत्र काम केले. या सुपरहिट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मास्टर, विक्रमनंतर लोकेशचा ‘थलापथी ६७’ चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी ‘संजय दत्त’ यांची निवड करण्यात आली आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘केजीएफ २’ (KGF 2) या चित्रपटामध्ये संजय दत्तने अधिरा ही व्यक्तिरेखा साकारली होती. हा संजय यांचा पहिला पॅन इंडिया चित्रपट होता. या चित्रपटानंतर ‘थलापथी ६७’ चित्रपटाच्या निमित्ताने संजय दत्त पुन्हा पॅन इंडिया चित्रपट करणार आहे. पिंकविला या वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार, विजयच्या महत्त्वकांक्षी चित्रपटामध्ये संजय दत्तसह अजून काही कलाकार खलनायक साकारणार आहे. लोकेश आणि संजय काही काळापासून संपर्कात होते. या बिगबजेट चित्रपटासाठी संजय दत्त यांनी तब्बल १० कोटी इतके मानधन घेतले आहे. या चित्रपटामध्ये मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज देखील या चित्रपटामध्ये खलनायक साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आणखी वाचा – चाहत्यांच्या गर्दीत अडकलेल्या रणवीरला थापड नेमकी कुणी मारली? रेड कार्पेटवरचा Video Viral

विजय सध्या त्याच्या ‘वरीसु’ (Varisu) या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. हा चित्रपट २०२३ च्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर विजयचा ‘थलापथी ६७’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.