‘केजीएफ चॅप्टर – १’ हा दाक्षिणात्य चित्रपटांमधील अतिशय लोकप्रिय आणि हिट चित्रपट आहे. या चित्रपटात सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत आहे. आता या चित्रपटाचा सिक्वेल ‘केजीएफ चॅप्टर – २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील भूमिका साकारणार आहे. २९ जुलै रोजी संजय दत्तचा चित्रपटातील लूक समोर येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो अधीरा हे पात्र साकारणार आहे. आता अधीराचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

नुकताच चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी केजीएफ २ विषयी माहिती दिली आहे. ‘केजीएफ चॅप्टर २मधील अधीराचा फर्स्ट लूक २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे’ अशी अधिकृत माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती. दुसरा भागाचा आवाका पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा असेल असे अभिनेता यशने सांगितले होते. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt kgf 2 look adheera will revel on 29th july avb
First published on: 27-07-2020 at 11:55 IST