संजय दत्तचा आगामी ‘संजू’ चित्रपट येत्या २९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर संजयची मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाच संजयविषयी अनेक नवनवीन गोष्टींचा सध्या खुलासा होत आहे. हे खुलासे होत असतानाच ‘डीएनए’ या वृत्तपत्राशी बोलताना रणबीरने संजयविषयीचा आणखी एक नवा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणबीर लहान असल्यापासून संजयला त्याचा आदर्श मानतो. इतकंच नाही तर लहान असताना त्याने त्याच्या रुममध्येही संजयचे पोस्टर,फोटोज लावले होते. त्यामुळे रणबीर संजयचा लहानपणापासून फॅन आहे असं म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे संजय आणि रणबीर केवळ याच चित्रपटामुळे एकमेकांच्या संपर्कात आले नसून ते पुर्वीपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या दोघांचेही परस्परांशी असलेले ट्युनिंग उत्तम असल्याचे रणबीरने  बोलताना सांगितले.

‘संजयला मी पहिल्यांदा काश्मीरमध्ये पाहिले होते. तेव्हा तो १९९३ साली माझ्या वडीलांबरोबर ‘साहिबा’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्यावेळी त्याला पाहताच मी त्याच्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित झालो होतो. त्यानंतर संजयप्रमाणे लूक करण्यास मी सुरुवात केली होती. मात्र या सा-यामुळे माझे वडील ऋषि कपूर चांगलेच वैतागले होते’, असंही तो म्हणाला.

पुढे तो असंही, ‘माझी आणि संजयची मैत्री पुढे चांगली रंगत गेली आणि संजयने मला माझ्या वाढदिवसाला हार्ले डेव्हिडसनची बाईक गिफ्ट केली. इतकंच नाही तर आम्ही दोघंही त्याच्या फरारी गाडीतून रात्रभर फिरत असू. मात्र संजयने मला बाईक गिफ्टी दिल्याचं ज्यावेळी ऋषि कपूर यांना समजलं त्यावेळी त्यांनी संजय घरी बोलावलं आणि चांगलंच खडसावलं. ‘माझ्या मुलाला अशा भेटवस्तू देऊन बिघडवणं बंद कर. त्याला तुझ्या सारखं करण्याचा प्रयत्न करु नकोस’, असे खडेबोल ऋषी कपूर यांनी संजयला सुनावले.

दरम्यान, हे जुने किस्से आठवल्यानंतर आता हसू येतं मात्र ‘संजू’ चित्रपट करत असताना हे सारे किस्से माझ्या डोळ्यासमोर येत होते. ‘संजू’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्याला प्रदर्शनापूर्वीच प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt scolded by rishi kapoor because he gifted harley davidson to ranbir
First published on: 20-06-2018 at 12:40 IST