१९९३ च्या बाँबस्फोटाप्रकरणी शिक्षा भोगणा-या अभिनेता संजयने पत्नी मान्यताचे आजारपण व मुलांकडे लक्ष देण्याचे कारण पुढे करत पॅरोलसाठी अर्ज केला आहे. त्याला आणखी ३० दिवसांची पॅरोल रजा हवी आहे.
१९९३ च्या बाँबस्फोटांमध्ये बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच संजय दत्त सुमारे दीड वर्ष तुरुंगात होता. गेल्या वर्षी मेमध्ये न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर संजय दत्त पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याला आणखी तीन वर्ष तुरुंगात काढावी लागणार आहेत. मात्र तुरुंगात गेल्यापासून संजय दत्त वारंवार पॅरोल रजेवर तुरुंगातून बाहेर येत आहे. यापूर्वी त्याने स्वतःच्या व तसेच पत्नी मान्यताच्या आजारपणाचे कारण देत पॅरोल रजा मंजूर करुन घेतली होती. २२ डिसेंबरपासून संजय दत्त पॅरोल रजेवर बाहेर आला असून २२ फेब्रुवारीला त्याला पुन्हा तुरुंगात हजर राहावे लागणार आहे. मात्र यापूर्वीच संजय दत्तने आणखी ३० दिवसांनी रजा वाढवून देण्यासाठी अर्ज केला आहे.