‘नायक नहीं, खलनायक हूँ मै..’ हे गाणं ऐकलं की डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे अभिनेता संजय दत्तचा. एकीकडे संजूबाबाच्या बायोपिकची जोरदार चर्चा असतानाच आता चाहत्यांना तो पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर कपूरच्या आगामी ‘शमशेरा’ या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
‘शमशेरा’च्या निमित्ताने संजय दत्त पहिल्यांदाच ‘यशराज फिल्म्स’च्या बॅनरअंतर्गत काम करणार आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात शमशेरा म्हणजेच रणबीरची भूमिका ताकदीची आणि निर्भीड आहे. त्यामुळे त्याच ताकदीचा किंबहुना त्याहून क्रूर खलनायक निवडणं गरजेचं होतं. यासाठी करण जोहरने संजूबाबाच्या नावावर शिक्कामोर्तब केला. यामध्ये प्रेक्षकांना भरभरून साहसदृश्ये पाहायला मिळतील यात काही शंका नाही.
Photos: दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधलेल्या श्री. व सौ. गणेशपुरेंचे फोटो पाहिलेत का?
याबद्दल संजय दत्त म्हणाला की, ‘माझे वडील आणि यश चोप्रा यांच्यात चांगली मैत्री होती. यशराज फिल्म्स अंतर्गत माझा हा पहिलाच चित्रपट असल्याने मी फार खूश आहे. रणबीरविरोधात खलनायकी भूमिका साकारण्यासाठी मी फार उत्सुक आहे.’
करम से डकैत,
धरम से आज़ाद
Presenting #RanbirKapoor in a never seen before avatar in YRF's next action adventure #SHAMSHERA. Directed by @karanmalhotra21 | @ShamsheraMovie pic.twitter.com/5Dqg7GDOhQ— Yash Raj Films (@yrf) May 7, 2018
दिग्दर्शक करण मल्होत्रासोबत संजय दुसऱ्यांदा काम करणार आहे. हृतिक रोशनच्या ‘अग्निपथ’ चित्रपटातही संजूबाबाने खलनायकाची भूमिका साकारली होती. एकीकडे ‘संजू’ या बायोपिकमध्ये रणबीरला संजयच्या भूमिकेत पाहणं आणि त्यानंतर ‘शमशेरा’मध्ये या दोघांना एकमेकांविरोधात पाहणं सिनेरसिकांसाठी नक्कीच औत्सुक्याचं ठरेल.