मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेलं नाव म्हणजे दिग्दर्शक संजय जाधव. संजय जाधवने आतापर्यंत दिग्दर्शित केलेला प्रत्येक चित्रपट हिट ठरला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटांमुळे अनेक कलाकारांचं नशीब फळफळलं आहे. मात्र पहिल्यांदाच संजय जाधवने त्याच्यासाठी ‘लकी’ असलेल्या कलाकारांची नाव जाहीर केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय जाधवने आपल्या आगामी ‘लकी’ चित्रपटाची घोषणा केल्यावर त्यामधले कलाकार कोण असतील याविषयी गेले कित्येक दिवस चित्रपटसृष्टीमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटांतील काही कलाकारांची नावं समोर आले असून पहिल्यांदाच या चित्रपटातून एक नवी जोडी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

दरम्यान, नवोदित अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती ही नवी जोडी पहिल्यांदाच लकी चित्रपटातून डेब्यु करणार असून सध्या ही जोडी संजयसाठी लकी असल्याचं म्हटलं जातय. संजयने या नवोदित कलाकारांच्या नावाची घोषणा सोशल मीडियाव्दारे केली आहे.

विशेष म्हणजे या नव्या कलाकारांची ओळख व्हावी यासाठी संजयने एक गाणं चित्रीत केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे दादा कायमच असं निराळं काही तरी करण्याचा प्रयत्न करत असतात. याच नव्या प्रयत्नामध्ये त्यांनी अनोख्या स्वरुपात या नवोदित कलाकारांची ओळख करुन दिली आहे, असं निर्माते सुरज सिंग म्हणाले.

‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला लकी’ चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay jadhav marathi director new movie lucky
First published on: 07-09-2018 at 14:28 IST