असं म्हणतात की, मुलींसाठी वडील नेहमीच खास असतात. अभिनेते संजय कपूर आणि त्यांची मुलगी शनाया कपूर ही बापलेकीची जोडीसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेते संजय कपूर कायमच सोशल मीडियावर आपल्या मुलीचं कौतुक करत असतात. आता शनाया बॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतेय. जान्हवी कपूरच्या आगामी ‘कारगिल गर्ल’ या चित्रपटासाठी ती सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळतेय. ‘पिंकव्हीला’ वृत्तवाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संजय कपूर म्हणाले की, “बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्यासाठी शनाया तयार आहे. चांगले काम करण्यासाठी ती खूप मेहनत घेईल.” अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या शनाया आणि जान्हवी दोघीही ‘कारगिल गर्ल’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात जान्हवी ‘गुंजन सक्सेना’ या भारतीय वायुसेनेतील  महिला वैमानिकेची भूमिका साकारत आहे. १९९९ साली युद्धादरम्यान कारगिल येथे असणाऱ्या गुंजन सक्सेना या पहिल्या महिला वैमानिकांपैकी एक होत्या.या चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारी महिन्यातच सुरु झाले आहे.

शूटिंगदरम्यानचा शनायाचा फोटो शेअर करत संजय कपूर यांनी लिहिले आहे की, ‘४१ अंश तापमानातसुद्धा माझी मुलगी अतिशय मेहनतीने सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडत आहे. शनाया, सिनेसृष्टीत तुझं स्वागत आहे.’ या फोटोत शनायाने चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळला असून उन्हापासून वाचण्यासाठी गॉगल आणि टोपीसुद्धा घातली आहे. या चित्रपटाचे शूटिंग लखनऊमध्ये सुरु आहे.

या चित्रपटात जान्हवीसोबत गुंजन सक्सेना यांच्या वडिलांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि भावाच्या भूमिकेत अंगद बेदी दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay kapoor calls shanaya a hard working daughter
First published on: 21-05-2019 at 17:13 IST