बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पहायला मिळते. ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. नुकताच साराने एका पूजेत सहभागी झाल्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे.
साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये सारा गंगा घाटात पूजा करत असल्याचे दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. साराने हे फोटो शेअर करत ‘गंगा नदी’ असे कॅप्शन दिले आहे.
यासोबतच साराचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती एका समुद्र किनारी आराम करताना दिसत आहे. सारा नेहमीच आई, अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम खानसोबत फिरताना दिसते. पण या फोटोमध्ये ती एकटीच दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘आई आणि भावाची आठवण येत आहे’ असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
Missing Mommy and Brother #homealone #mondayblues @ncstravels @luxnorthmale
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
काही दिवसांपूर्वी साराचा ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. मात्र भरकटलेल्या कथानकामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.