अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाल्यापासूनच तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. अभिनयाचा वारसा मिळालेली सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण करण्यात आले.
वाचा : TOP 10 NEWS ‘अंगुरी भाभी’च्या इंग्रजीची हिनाने उडवलेल्या खिल्लीपासून अजून बरंच काही..
‘केदारनाथ’मध्ये सारा कोणती भूमिका साकारणार, तिचा लूक कसा असणार याविषयी बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यादरम्यान, चाहत्यांनी चित्रपटाच्या सेटवरील तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सलवार – कुर्ता अशा साध्या पोशाखातील साराने नाकात नोजपिन घातलेली दिसत असून, तिच्या हातात छत्री पाहावयास मिळते. बऱ्याचदा पाश्चिमात्य कपड्यांमध्ये दिसणाऱ्या साराच्या या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. पण या लूकमुळे तिच्या भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी आता आणखीनच उत्सुकता निर्माण झालीये.
First look of #SarahAliKhan in #Kedarnath directed by @Abhishekapoor. Producers @tseries @kriarj pic.twitter.com/UfzEF2KTeP
— Priya Gupta (@priyagupta999) October 8, 2017
विशेष म्हणजे, तुम्ही हे फोटो निरखून पाहिल्यास सारामध्ये तुम्हाला अमृता सिंगची झलक पाहावयास मिळेल. आपल्यासमोर जणू तारुण्यावस्थेतील अमृताच उभी असल्याचा भास हे फोटो पाहून होतो. ज्याप्रमाणे ‘बेताब’ हा पहिलाच चित्रपट अमृतासाठी सर्वाधिक हिट ठरला होता. त्याप्रमाणे सारालाही ‘केदारनाथ’मधून यश मिळेल, अशी अपेक्षा आहे.
वाचा : ‘पुरस्कार परतच करायचे असतील, तर मग स्वीकारता तरी कशाला?’
‘केदारनाथ’चे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत असून, त्यानेच चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवर दिली. सारा आणि चित्रपटातील मुख्य अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यासोबतचा फोटो त्याने शेअर केलाय.