बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता अक्षय कुमार आणि धनुषसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील पहिले गाणे ‘चका चक’ प्रदर्शित झाले. या गाण्यातील साराच्या डान्सने अनेकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये साराला, विकी आणि कतरिनाच्या लग्नात ‘चका चक’ गाण्यावर परफॉर्म करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

साराने नुकताच ‘डीएनए’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला विकी आणि कतरिनाच्या लग्नात ‘चका चक’ गाण्यावर परफॉर्म करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न ऐकून सारा अली खानला हसू अनावर झाले होते. ‘मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही’ असे सारा म्हणाली आहे.
आणखी वाचा : कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नावर सलीम खान यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

साराचे ‘अतरंगी रे’ चित्रपटातील ‘चका चक’ हे गाणे चर्चेत होते. गाण्यातील साराचा डान्स प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. तसेच या गाण्यातील साराचा लूक देखील चर्चेत होता. त्यामुळे आता विकी आणि कतरिनाच्या लग्नात ती या गाण्यावर डान्स करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतरिना आणि विकी ७ ते १२ डिसेंबर दरम्यान लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाच्या वेळी फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज केल्याचे म्हटले जात आहे.