सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आता सुशांत सिंग राजपूतसोबत काम करायला सज्ज झाली आहे. अभिषेक कपूर याच्या ‘केदारनाथ’ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिषेकच्या ‘काय पो छे’ या सिनेमातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक कपूर दिग्दर्शित या सिनेमात सारा आणि सुशांत हे प्रेमीयुगुलाची भूमिकेत दिसणार आहेत.

रोमॅण्टिक ड्रामा असलेल्या या सिनेमासाठी बालाजी मोशन पिक्चर्स आणि क्रीअर्ज एण्टरटेन्मेण्ट लवकरच हातमिळवणी करणार असल्याचे बोलले जात आहे. या वर्षाच्या अखेरीस या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होईल. पण अजूनही बालाजी मोशन पिक्चर्सच्या वतीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. सारा नुकतीच आई अमृता सिंग, दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि सुशांत सिंग राजपूतसोबत रात्रीच्या जेवणाला बाहेर गेली होती. सिनेमाबद्दल पुढील चर्चा करण्यासाठी हे चौघं भेटले होते.

अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी

सारा आणि करण जोहरचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे करणच्या ‘स्टुडंट ऑफ दी इयर २’ या सिनेमात सारा झळकेल असे अनेकांना वाटत होते. पण प्रत्यक्षात मात्र तसे काही झाले नाही. करणचा सिनेमा मागे पडतो न पडतो तोच दिग्दर्शक करण मल्होत्राच्या आगामी सिनेमात ती सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत झळकणार होती अशाही चर्चा होत्या. या सिनेमाची निर्मिती स्वतः सलमान आणि हृतिक करणार होते. सध्या सारा, अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. पण या दोघांनीही कधी हे उघडपणे मान्य केले नाही. तर दुसरीकडे सुशांत सिंग त्याचा आगामी सिनेमा ‘राबता’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. येत्या ९ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

VIDEO: राणा डग्गुबतीच्या आगामी चित्रपटाचा दमदार टिझर पाहिलात का?