लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांच्या मागणीनुसार ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. या मालिकांमध्ये ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘शक्तिमान’, ‘देख भाई देख’, ‘सर्कस’, ‘ब्योमकेश बक्षी’, ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकांचा समावेश आहे. आता इतर चॅनेलवर देखील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात झाली आहे. या मालिकांमध्ये दोन नव्या कॉमेडी मालिकांचा समावेश झाला आहे.
‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार भारत वाहिनीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. ‘तब्बल १६ वर्षांनंतर इंद्रवदन तुमच्या भेटीस येणार आहे. ६ एप्रिल पासून साराभाई वर्सेस साराभाई दररोज सकाळी १० वाजता स्टार भारत वाहिनीवर’ असे ट्विट केले आहे.
16 साल बाद, इंद्रवदन आ रहा है आप से मिलने फिर एक बार!
देखिए ''साराभाई Vs साराभाई'', 6 अप्रैल से, हर-रोज़ सुबह 10 बजे, सिर्फ़ STAR भारत पर!#KhichdiwithSarabhais pic.twitter.com/iGkpoUFxmO— STAR भारत (@StarBharat) April 3, 2020
तर त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये ‘खिचडी’ ही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. ‘१८ वर्षांनंतर पुन्हा प्रफुल तुमच्या भेटीस येत आहे. ६ एप्रिल पासून सकाळी ११ वाजता पाहा खिचडी मालिका फक्त स्टार भारत वाहिनीवर’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
18 साल बाद, जयश्री और बाबूजी की नोक-झोक होंगी शुरू फिर एक बार!
देखिए 'खिचड़ी', 6 अप्रैल से, हर-रोज़ सुबह 11 बजे, सिर्फ़ STAR भारत पर!#KhichdiwithSarabhais pic.twitter.com/Gkt6tYCZRl— STAR भारत (@StarBharat) April 4, 2020
‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ या दोन कॉमेडी मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. एकेकाळी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मधील इंद्रवदन आणि ‘खिचडी’ मालिकेतील प्रफुल ही पात्रे विशेष गाजली होती. आता या दोन्ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहते फार आनंदी आहेत.