वाड्यात दुर्गाच्या येण्याने ‘सरस्वती’ मालिकेला एक वेगळे वळण मिळाले आहे. विद्युल आणि भुजंग दुर्गाला आपल्या कारस्थानामध्ये नकळतपणे सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भैरवकरांचा वाडा सरस्वतीच्या नावावर असून, जोपर्यंत दुर्गा त्या कागदपत्रांवर हस्ताक्षर करत नाही तोपर्यंत तो वाडा विद्युलच्या नावावर होऊ शकत नाही. दरम्यान, विद्युलच्या कारस्थानांशी पूर्णपणे अनभिज्ञ असलेली दुर्गा तिला स्वत:च्या तालावर नाचवते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : ..या कारणामुळे रणवीर-दीपिकामध्ये व्हायचे भांडण

दुर्गाचा वाड्यातील वावर एकदम बिनधास्त असा आहे. त्यामुळे मालिकेमध्ये एकप्रकारचे हलकेफुलके वातावरण पहायला मिळते. येत्या १९ नोव्हेंबरला दुर्गा प्रेक्षकांना जादुचे खेळही खेळताना दिसेल. दुर्गाच्या बिनधास्त, मनमोकळ्या आणि बेधडक स्वभावामुळे तिच्याकडून मनासारखे काम करून घेणे विद्युलला कठीण जात आहे. दुर्गा कशी वागेल, कुठे काय बोलेल याचा काही नेम नाही. ती कुणालाच घाबरत नाही, त्यामुळे तिला आपल्या तालावर नाचवणं विद्युलसाठी कठीण झालं आहे. आता विद्युल दुर्गाला त्या कागदपत्रांवर हस्ताक्षर करण्यास मनवू शकेल की नाही ? दुर्गा अजून कोणत्या अडचणी विद्युलसाठी निर्माण करणार हे लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.

वाचा : अमिताभ यांनी अपघाताचे वृत्त फेटाळले

विद्युलला दुर्गाचे हस्ताक्षर कागदपत्रांवर हवे आहेत पण अचानक वाड्यामधील सगळे पेन गायब झाले आहेत. आता यामागे नक्की कोण आहे ? दुर्गानेच ते पेन लपवले आहेत की भुजंगचा या मागे काही डाव आहे ? दुर्गाच्या वाड्यातील काही गंमती जमती तसेच ती विद्युलला कशी स्वत:च्या तालावर नाचवते ते प्रेक्षकांना बघायला मिळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saraswati serial updates durga become magician
First published on: 17-11-2017 at 13:04 IST