‘तेरे नाम’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक सुपरहिट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २००३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे सलमान खान खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा सुपरस्टार झाला होता. या चित्रपटानं त्याकाळी तब्बल ३५ कोटी रुपयांची कमाई केली होती. आनंदाची बाब म्हणजे दिग्दर्शक सतीश कौशिक या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. शिवाय या चित्रपटात देखील सलमान खानच मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – बिग बी-नागराज यांच्या ‘झुंड’चे प्रदर्शन अडचणीत; सर्वोच्च न्यायालयानेच घातली बंदी

मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सतीश कौशिक यांनी या आगामी चित्रपटाची घोषणा केली. ते म्हणाले, “माझ्याकडे एक कथानक आहे जे मी तेरे नामच्या सिक्वलच्या स्वरुपात मांडू शकतो. गेल्या काही काळापासून मी कथानकावर काम करत आहे. मला खात्री आहे हे कथानक सलमानला देखील आवडेल. येत्या काही काळात सलमानशी चर्चा करुन आम्ही या चित्रपटाची अधिकृत घोषणा करु.”

अवश्य पाहा – ही दोस्ती तुटायची नाय; ‘ग्रॅव्हिटी’ सुपरहिट होताच अभिनेत्याने मित्रांमध्ये वाटले ७४ कोटी

तेरे नाम हा एक रोमँटिक सस्पेन्स पठडीतील चित्रपट होता. या चित्रपटात सलमान खानने राधे ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. तर भूमिका चावला ही राधेच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. राधेचं निरजावर (भूमिका) खूप प्रेम असतं. परंतु तिचे कुटुंबीय दुसऱ्या एका व्यक्तीसोबत तिचं लग्न लावून देतात. त्यानंतर निरजाचा कर्करोगामुळे मृत्यू होतो. अन् राधेला तिच्या मृत्यूचा जबरदस्त मानसिक धक्का बसतो. अशा प्रकारचं कथानक या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट अफलातून गाणी आणि सलमान-भूमिकाच्या जबरदस्त केमिस्ट्रीमुळे गाजला होता. गेली १७ वर्ष चाहते या चित्रपटाच्या सिक्वलची वाट पाहात आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satish kaushik tere naam 2 salman khan mppg
First published on: 20-11-2020 at 18:16 IST