‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेतील अभिनेत्री शिल्पा शिंदेवरील लैंगिक शोषणाबद्दल माहिती नसल्याचे सांगत शिल्पाची सहकलाकार सौमय्या टंडनने निर्मात्याची वर्तणूक चांगली असल्याचे म्हटले आहे.  शिल्पा शिंदेने ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेचा निर्माता संजय कोहलीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ‘तू मला खूप आवडतेस. तू खूप हॉट आणि सेक्सी आहेस. अशा भाषेत संजयने माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर जबरदस्ती करत त्याने माझ्या शरीराला स्पर्श केला. मी त्याला विरोध करत असताना, त्याने हे तर चालतच असते, असे बोलत माझ्याशी गैरवर्तन केले.’, असा आरोप शिल्पा शिंदेने केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण हा सर्व प्रकार सहकलाकार सौमय्याला सांगितला असल्याचे तिने म्हटले होते. मात्र, सोमय्याने या घटनेकडे गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष केल्याचे ती म्हणाली होती.  याप्रकरणावर नुकतेच सौमय्याला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. शिल्पासोबत घडलेला प्रकार तुला माहिती होता का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना सौमय्या म्हणाली, कामाच्या ठिकाणी असो किंवा इतर ठिकणी अशा घटनांना मी कधीच प्रोत्साहन देत नाही. मी नेहमीच अशा परिस्थितीत खंबीरपणे महिलांच्या पाठिशी उभी राहण्याला प्राधान्य देते. आमच्या दोघींच्यात याप्रकरणी कोणताही संवाद झालेला नाही. माझे आणि संजयचे व्यावसायिक संबंध चांगले आहेत. मला वैयक्तिकरित्या त्याच्यापासून कोणताही त्रास जाणवलेला नाही, असेही सौमय्या टंडन म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saumya tandon denies communication with shilpa shinde in shilpa shinde
First published on: 27-03-2017 at 17:00 IST