दिव्या खोसला दिग्दर्शित ‘यारिया’ चित्रपटात शिक्षिकेच्या भूमिकेत दिसलेली ‘मिस इंडिया’ सायली भगत लग्नानंतर बऱ्याच काळापासून कॅमेऱ्यापासून दूर होती. परंतु आता ती मराठी चित्रपटातून दमदार पुनरागमन करत आहे. लवकरच ती ‘यली’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे. ‘यली’चे कथानक हे गुन्हेगारी विश्वावर आधारित आहे. या चित्रपटात सायली एका अत्यंत हुशार आणि धाडसी ‘एटीएस’ अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, चित्रपटातील तिची भूमिका प्रसिध्द पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या शैलीवर आधारित आहे. ‘यली’मध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याची दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळालेल्या सायलीने ह्या भूमिकेसाठी कठोर प्रशिक्षण घेतल्याचे बोलले जाते. सायलीच्या रुपाने मराठी चित्रपटसृष्टीला आणखी एक सुंदर, बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री मिळणार आहे यात शंकाच नाही.

sayali-bhagat-01

sayali-bhagat-02 sayali-bhagat-03