सायली देवधर दिसणार ‘वैदेही’ मालिकेत

मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

sayli devdhar, vaidehi, vaidehi serial, vaidehi upcoming serial,
ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे.

सोनी मराठी वाहिनी नवनवीन मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. अभिनेत्री सायली देवधर हिची मुख्य भूमिका असलेली ‘वैदेही’ – शतजन्माचे आपुले नाते, ही नवी मालिका 16 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांमध्ये मालिकेबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्‍या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी आहे आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

‘वैदेही’ या मालिकेत अभिनेत्री सायली देवधरसोबत अभिनेत्री पल्लवी अजय पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे यासुद्धा दिसणार आहेत. मालिकेचा प्रोमो पाहता चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिका कधी सुरु होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sayli devdhar vaidehi serial promo released avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या