सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा फारशी चर्चेत नसते. परंतु अलिकडेच तिच्यासोबत घडलेल्या एका गंमतीशीर प्रसंगामुळे ती चर्चेत आहे. श्वेता सलमानला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. परंतु गेटवरील वॉचमनने तिच्या वयाचे कारण पुढे करत तिला आत घेतले नाही.
श्वेता आपल्या मित्रमंडळींसमवेत सलमानला भेटण्यासाठी त्याच्या वर्सोवा येथील घरी गेली होती. परंतु वॉचमनने तिला घराच्या गेटवरुन आता घेतले नाही. त्यानंतर तिने याबाबत कारण विचारले असता, वॉचमनने श्वेताच्या वयाचे कारण पुढे केले. तिचे वय पाहाता ती सलमान खानची बहिण वाटत नाही असे तो म्हणाला. त्यानंतर तिने आपले ओळखपत्र दाखवले त्यानंतर तिला गेटच्या आत प्रवेश मिळाला. हा गंमतीशीर किस्सा श्वेताने स्पॉटबॉय या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
“सुरुवातीला त्या वॉचमनने माझ्या वयाबाबत घेतलेला आक्षेप पाहून आश्चर्य वाटले. परंतु त्या नंतर मला आनंद झाला. कारण कुठल्या स्त्रीला तिच्या खऱ्या वयापेक्षा लहान समजलेलं आवडणार नाही.” असेही श्वेता म्हणाली. श्वेता रोहिरा सलमानची मानलेली बहिण आहे. अलिकडेच ती तिचा घटस्फोटीत पती पुलकित सम्राटमुळे चर्चेत होती. श्वेता सध्या अभिनयाचे प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे लवकरच ती प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसेल असे म्हटले जात आहे.