Bipasha Basu and Karan Singh: बिपाशा आणि करणचा मालदिवमध्ये ‘हनिमून’

दोघांनी आपल्या हनिमूनसाठी देखील सुंदर समुद्रकिनारे असलेल्या ठिकाणालाच पसंती दिली.

समुद्रकिनारी बसलेल्या करणचे एक छायाचित्र पोस्ट करून बिपाशाने मालदिवच्या नयनरम्य समुद्रकिनाऱयाचा एक व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

नवविवाहीत जोडपे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांना समुद्रकिनारी सुटीचा आनंद घेणे नेहमीच आवडते. दोघांनी आपल्या हनिमूनसाठी देखील सुंदर समुद्रकिनारे असलेल्या ठिकाणालाच पसंती दिली. बिपाशा आणि करण हनिमूनसाठी मालदिवला गेले असून, तेथील काही छायाचित्रे बिपाशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहेत.
समुद्रकिनारी बसलेल्या करणचे एक छायाचित्र पोस्ट करून बिपाशाने मालदिवच्या नयनरम्य समुद्रकिनाऱयाचा एक व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. याशिवाय, दोघांनी मालदिवमध्ये दाखल होताच एक वेलकम केक देखील कापला. त्याचेही छायाचित्र बिपाशाने पोस्ट केले आहे. मग करणनेही बिपाशाचा समुद्रकिनारी टीपलेला हॉट फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला.

Sun Sea Clouds Love ❤️Thank you 🙏

A video posted by bipashabasu (@bipashabasu) on

The sweetest welcome cake❤️ Thank you #jumeiravittaveli

A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on

My wife is a goddess! 😍 I got lucky or what?!!

A photo posted by karan singh grover (@iamksgofficial) on

❤️❤️❤️❤️❤️❤️ #monkeymooning !

A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: See pics of bipasha basu and karan singh grovers honeymoon in maldives

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या