कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी चाहत्यांमुळे. बऱ्याच वेळा चाहते आपल्या आवडत्या कालाकाराला भेटेण्यासाठी प्रयत्न करत असतात. कधी कधी ते आपल्या आवडत्या कलाकारांना भेटवस्तू पाठवताना दिसतात. पण २८ वर्षीय अभिनेत्रीला एका व्यक्तीने सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे भेट म्हणून पाठवले आहे. अभिनेत्रीने पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली असून पोलीस सध्या त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून एक व्यक्ती अभिनेत्रीला तिच्या घरी काही भेटवस्तू पाठवत आहे. या भेटवस्तूंमध्ये सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे आहेत. सुरुवातीला अभिनेत्रीने याकडे दुर्लक्ष केले. पण सतत अशा भेटवस्तू येऊ लागल्यामुळे अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली. अंबोली पोलीस ठाण्यात अभिनेत्रीने तक्रार दाखल केली असून पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sex toy and undergarments to 28 year old actress fir registered avb
First published on: 22-09-2021 at 15:03 IST