शाहरुख खान आणि गौरी ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. १९९१ साली या दोघांनी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून आजतागायत या दोघांनी एकमेकांची कायम साथ दिली आहे. अलिकडेच त्यांच्या लग्नाला तब्बल २९ वर्ष पुर्ण झाली. त्यामुळे लग्नाच्या वाढदिवशी शाहरुखनं आपल्या पत्नीला काय गिफ्ट दिलं? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – आली लहर केला कहर; अभिनेत्रीने वाढदिवशी केला ११ हजार फुटांवरुन स्टंट

सर्वाधिक वाचकपसंती – ‘ती माझ्या मांडीवर बसली होती’; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलिकडेच लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने ट्विटरवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन केलं होतं. या सेशनमध्ये नेटकरी शाहरुखला कुठलाही प्रश्न विचारतील अन् तो त्यांना उत्तरं देईल असं या सेशनचं स्वरुप होतं. त्यावेळी देखील एका चाहत्याने त्याला हाच प्रश्न विचारला. “शाहरुख तुझ्या लग्नाला २९ वर्ष पुर्ण झाली. वाढदिवशी तू आपल्या पत्नीला कोणतं गिफ्ट दिलंस?” चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, “गौरी हिच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे. तिला मी काय देणार?” शाहरुखचं हे गंमतीशीर उत्तर सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.