आपल्या चित्रपटातील बहुचर्चित डायलॉगचा उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भाषणात करणे अभिमानास्पद असल्याचे ट्विट बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने केले आहे. चित्रपटातील डॉयलॉगच्या रुपाने ओबामांच्या भाषणात आपला समावेश होणे अभिमानास्पद आहे. पण, ओबामांनी ‘भांगडा’ नृत्य केले नाही याचे दु:ख असून पुढीलवेळी ‘चल छैंय्या छैंय्या’ गाण्यावर नक्की ठेका धरू, असेही शाहरुखने मिश्किलपणे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सॅनोरिटा, बडे बडे देशों में… आणि बराक ओबामा
दरम्यान, ओबामा यांनी मंगळवारी दक्षिण दिल्लीत सिरी फोर्ट सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीलाच ओबामा यांनी  सर्वांना ‘नमस्ते’ केला. त्यानंतर सॅनोरिटा, बडे बडे देशों में… मला काय म्हणायचे आहे, ते तुम्हाला कळले असेलच असे सांगत शाहरुखच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातील शाहरुखच्या डायलॉगप्रमाणे आपल्यावर बॉलीवूड चित्रपटांची भूरळ असल्याचे दाखवून दिले.