‘ए दिल है मुश्किल’चा टिझर प्रदर्शित झाला आणि इण्टरनेटवर या टिझरने अक्षरशः धुमाकूळ घातला. या टिझरवरुन सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच की या सिनेमात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. पण जी गोष्ट कदाचित तुम्हाला माहित नसेल ती म्हणजे या सिनेमात शाहरुख खानची नक्की भूमिका कुठली आहे.
शाहरुख ‘ए दिल है मुश्किल’मध्ये कॅमिओ करतो आहे ही बातमी तर आधीच येऊन गेली आहे. पण या सिनेमात त्याची नेमकी भूमिका काय असणार याबाबद गुप्तता राखण्यात आली होती. सुत्रांनुसार आता त्याच्या भूमिकेबद्दलही माहिती मिळाली आहे. शाहरुख या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनच्या नवऱ्याची भूमिका करत आहे. ज्याचा कालांतराने मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूनंतरच रणबीर आणि ऐश्वर्या यांच्या प्रेम कथेला सुरुवात होते. ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमातून ऐश्वर्या आणि शाहरुख १४ वर्षांनी एकत्र काम करणार आहे. याआधी २००२ मध्ये ‘देवदास’ या सिनेमात त्यांनी एकत्र काम केले आहे.
शाहरुखशिवाय करण जोहर सिनेमा करणार हे आतापर्यंत तरी झाले नाही. त्यामुळे ‘ए दिल है मुश्किल’ सिनेमात तो नसणार हे काही रुचत नव्हतं. पण नंतर शाहरुख या सिनेमात कॅमिओ करणार हे नंतर स्पष्ट झाले. किंग खान या सिनेमात कॅमिओ जरी करणार असला तरी करणच्या सिनेमात असण्याचा त्याचा इतिहास त्याने यावेळीही मोडला नाही. करणने दिग्दर्शित केलेला ‘स्टुण्डट ऑफ दि इयर’ या सिनेमात शाहरुखने एका गाण्यात कॅमिओ केला होता ज्यात काजोलही दिसली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुखच्या आधी ही भूमिका सैफअली खान करणार होता. पण सैफ अली खानने ही भूमिका करण्यासाठी नकार दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan plays aishwarya rais husband in ae dil hai mushkil
First published on: 31-08-2016 at 21:19 IST