देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती अनोख्या पद्धतीने आवाहन करत आहेत. मतदारांना जागृत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने गाण्याच्या माध्यमातून आवाहन करणारा एक व्हिडीओ तयार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुखने स्वत: हे गाणं गायलं आहे. तर तनिष्क बागची आणि अब्बी व्हायरल यांनी ते शब्दबद्ध केले आहे. जवळपास १ मिनिटाचं हे रॅप साँग असून मतदान करण्याच्या अधिकाराचं महत्त्व त्यात सांगितलं गेलं आहे. ‘मतदान फक्त आपला हक्क नाही, तर ही आपली शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर करा,’ असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या व्हिडिओची स्तुती केली आहे. ‘उत्तम प्रयत्न.. देशातील नागरिक आणि विशेषकरून पहिल्यांदा मतदान करणारे लोक तुझ्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देतील आणि मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर येतील असा मला विश्वास आहे,’ असं ट्विट मोदींनी केलं.

मतदानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मोदींनी मार्चमध्ये सेलिब्रिटींना पुढाकार घेण्यासाठी सांगितलं होतं. त्यापैकी किंग खानने अनोख्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करून त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan raps to encourage voters pm modi calls it a fantastic effort
First published on: 23-04-2019 at 16:41 IST