मनःशांतीसाठी शाहरुखकडून बुद्धाच्या पुस्तकांचे वाचन

‘कोलकाता नाईट रायडर्स’च्या विजयाने भारावून गेलेल्या शाहरुख खानने आपल्या मनःशांतीसाठी गौतम बुद्धांची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली आहे.

‘कोलकाता नाईट रायडर्स’च्या विजयाने भारावून गेलेल्या शाहरुख खानने आपल्या मनःशांतीसाठी  गौतम बुद्धांची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून आयपीएल स्पर्धेदरम्यान, कोलकाता संघातील उतार-चढाव अतिशय जवळून अनुभविले असल्याने सामन्यांदरम्यान संघाप्रती भरपूर उत्साही असायचो त्यामुळे आता मन:शांतीसाठी  गौतम बुद्धांची पुस्तके मदत करतील असे शाहरूखने म्हटले आहे.
‘आयपीएल’च्या या हंगामात उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर संघमालक शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत विजयी सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी शाहरूखने मोठ्या जल्लोषात संघाप्रती आनंद व्यक्त केला. शाहरुख आता फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’च्या चित्रीकरणात व्यस्त झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shah rukh khan turns to books on buddha to stay calm

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या