ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने पहिल्याच दिवशी भारतात तब्बल ३३ कोटींची कमाई केली आहे. तसेच याआधी केवळ पेड प्रिव्ह्यूमुळे चित्रपटाने भारतात ६.७५ कोटींचा निव्वळ नफा कमवून २.७ कोटी इतका सर्वाधिक पेड रेकॉर्ड असलेल्या ‘३ इडियट्स’ चित्रपटाला मात दिली.
चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार, चेन्नई एक्स्प्रेसने गुरूवारी म्हणजे चित्रपट प्रदर्शित झालेल्या पहिल्याच दिवशी भारतात तब्बल ३३.१२ कोटींची कमाई केली आहे. तर, शुक्रवारी मिळालेल्या आकड्यांनुसार दोन दिवसांत शाहरूखच्या चेन्नई एक्स्प्रेसने ३९.८७ कोटींचा गल्ला जमवला आहे.
पहिल्याच दिवशी ३३ कोटींचा आकडा गाठणाऱया चेन्नई एक्स्प्रेसने नवा विक्रम केला आहे. एकंदर शाहरुख-दीपिकाची चेन्नई-एक्स्प्रेस सुसाट सुटली असल्याचेच चित्र आहे.
#ChennaiExpress Thu previews 6.75 cr, Fri 33.12 cr. Total: 39.87 cr nett. India biz only. All previous records shattered. Creates History!
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— taran adarsh (@taran_adarsh) August 10, 2013