गाजलेल्या जुन्या गाण्यांना नवा टच देत त्यांचे रिक्रिएटेड व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आणले जातात. बॉलिवूडमध्ये सध्या रिक्रिएटेड गाण्यांचा ट्रेण्डच दिसून येत आहे. तमिळ चित्रपटातील प्रभूदेवाचं गाजलेलं गाणं ‘उर्वशी.. उर्वशी’ आता नव्या रुपात येणार आहे. एका म्युझिक व्हिडिओसाठी या गाण्याची निवड झाली असून ‘उर्वशी’च्या रिक्रिएटेड व्हर्जनवर शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी थिरकणार आहेत.

१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ रोमकॉम ‘कढलन’ या चित्रपटातील ‘उर्वशी’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. टी सीरिजचे भूषण कुमार या रिक्रिएटेड म्युझिक व्हिडिओची निर्मिती करणार आहेत. रॅपर यो यो हनी सिंगने त्याला संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यावर सध्या मुंबईत शूटिंग सुरू असून गिफ्टी याचं दिग्दर्शन करत आहेत. तर कोरिओग्राफीची धुरा संजय शेट्टीने सांभाळली आहे. ‘मूळ गाण्याचे काही बोल आम्ही बदलले आहेत. फिल्म सिटीमधल्या क्लब सेटवर गाण्याची शूटिंग करत आहोत. काही दृश्यांचं चित्रण पार्किंगच्या ठिकाणीही करण्यात आली आहे. एकंदरीत आम्ही या गाण्याला अनोखा टच देणार आहोत जे प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे,’ अशी प्रतिक्रिया संजय शेट्टीने दिली.

Video : अखेर शाहिदच्या पत्नीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

रिक्रिएटेड गाण्यांमुळे मूळ गाण्याचं सौंदर्य हरपतं असं अनेकदा म्हटलं जातं. बऱ्याच रिक्रिएटेड व्हर्जन्सना प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यामुळे आता ‘उर्वशी..’ या गाण्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.