एकेकाळी बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहिद कपूरने खूप यश अनुभवले. परंतु, काही चुकीच्या निर्णयांचा त्याला पश्चाताप करावा लागला होता. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ चित्रपटात दमदार अभिनय करणाऱ्या शाहिदने एका पार्टीदरम्यान आपल्या चुकांचा उल्लेख केला. ‘कमीने’ चित्रपटानंतर मी दिशाहिन झालो होतो. त्यामुळे ‘हैदर’ चित्रपटानंतर मला तिच चूक पुन्हा करायची नव्हती. ‘हैदर’ चित्रपटामुळे प्राप्त झालेला सन्मान आणि कौतुकाच्या जोरावर अधिक चांगल्या व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर रंगविण्याची माझी इच्छा होती. ‘उडता पंजाब’ चित्रपट मिळाल्याने मला फार काळ वाट पाहावी लागली नाही याचा आनंद आहे, ‘उडता पंजाब’च्या यशानिमित्त आयोजित पार्टीमध्ये तो बोलत होता. युवकांना काही तरी वेगळे हवे असल्याचे ‘कमीने’ चित्रपट केल्यानंतर मला जाणवले. असे असले तरी नवीन काही तरी आजमावून पाहाण्यासाठी आपण साशंक असतो, असेदेखील तो पुढे म्हणाला. १७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ३३.८० कोटीची कमाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor said he went to the wrong track after movie kaminey
First published on: 22-06-2016 at 14:37 IST